Cyber fraud : सायबर फसवणुकीचा नवा प्रकार: बनावट ई-मेलद्वारे (Fake email) ३ कोटी रुपयांची फसवणूक

Cyber fraudNew typeFake email3 crore rupeesScam

नाशिक | सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या (Cyber fraud) नवनवीन क्लृप्त्या शोधून मोठ्या रकमेचा घोटाळा करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. बनावट ई-मेल तयार करून आणि कंपनीचा खोटा समावेश दाखवून एका दाम्पत्याने तब्बल ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Cyber fraud कसे झाली फसवणूक?

फिर्यादी विवेक ग्यानुजी मोगल (६९, रा. आनंदवल्ली) यांची व्हर्चुअल कन्स्ट्रक्शन सोल्युशन कंपनी असून, संशयित नीरव किरण शहा (४२, रा. पुणे) आणि अनघा नीरव शहा (रा. उंटवाडी रोड) हे मागील वर्षी जानेवारीपासून त्यांच्या कंपनीत नोकरीला होते.

संशयित दाम्पत्याने स्वतःची एएनएस डिझाइन स्टुडिओ नावाची कंपनी सुरू करून, बनावट ई-मेलद्वारे ती मोगल यांच्या व्हीसीएसबी एलएलसी कंपनीत विलीन झाली असल्याची खोटी माहिती नोव्हा सव्हिसेस इंक या कंपनीला दिली.

संशयितांनी मोगल यांच्या कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल तयार केले आणि त्याच आधारावर ३ कोटी रुपयांचे कंत्राट स्वतःच्या कंपनीकडे वळवले. या प्रकारामुळे मोगल यांना मोठा आर्थिक फटका बसला.

हा प्रकार म्हणजे सायबर फसवणुकीचा नवा नमुना असून, यापूर्वीही अशाप्रकारे भागीदारांकडून फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कंपन्यांनी कोणत्याही व्यवसायिक व्यवहारांपूर्वी पूर्ण पडताळणी करणे गरजेचे आहे.