Daily Horoscope : आजचा दिनविशेष : मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीचे शुभ संकेत! 25 Feb 2025

bhavishya monday 202210900221 4

मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५. माघ कृष्ण द्वादशी/त्रयोदशी. शके १९४६, संवत २०८१. वसंत ऋतू.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे” भौम प्रदोष

नक्षत्र – उ. षा./(संध्याकाळी ६.३१ नंतर) श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्र आणि नेपच्यूनशी लाभ योग आहे. वरिष्ठ खुश होतील. दूरचे प्रवास घडतील. नोकरीत उत्तम लाभ होतील. विशेषतः भिन्न लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवास घडतील. वाहन सुख लाभेल. जलप्रवास होतील. अनपेक्षित लाभ होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अष्टम स्थानी चंद्र आहे. सांभाळून पावले टाका. महिलांकडून लाभ होतील. चैनीवर खर्च कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. भेटवस्तू मिळतील. सन्मान होतील. व्यवस्यात आणि नोकरीत नैतिकता सोडू नका.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) षष्ठ स्थानात चंद्र आहे. महिलांकडून दोषारोप होऊ शकतात. पाण्यापासून सावध रहावे. मोठे करार करू नयेत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अकल्पित लाभ होतील. शेअर्स मध्ये यश मिळेल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ व्यतीत कराल. सहल घडेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामात व्यस्त व्हाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. त्यात महिलांकडून सहकार्य लाभेल. नवीन खरेदी होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तृतीय चंद्र उत्तम अर्थ लाभ मिळवून देतील. व्यावसायिक यश लाभेल. प्रेमात व्यक्त व्हाल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्य लाभेल. महिलांची दागिने खरेदी होऊ शकते. स्थावर संपत्ती वाढेल. शेतीची कामे मार्गी लागतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मेजवानी मिळेल. नात्यातून शुभ समाचार समजतील. अचानक लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाचे करार आज नकोत. आरोग्य विषयक कामांत वेळ जाईल. पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मौज कराल. प्रवास घडतील. कलाकारांना संधी मिळेल. मनासारखा दिवस व्यतीत होईल.

  • ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.