महिलांना मिळणार 1500 रुपये; सरकारकडून निधी वितरण सुरू
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारी रोजी या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याची घोषणा केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे निधी वितरणाला उशीर झाला. अखेर महिला व बाल विकास विभागाने आजपासून रक्कम हस्तांतरित केली असल्याचे जाहीर केले.
लाडक्या बहिणींना मिळणार 1500 रुपये (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्यासाठी पात्र महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र, पडताळणी प्रक्रियेनंतर 9 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले, त्यामुळे यावेळी तुलनेत कमी महिलांना लाभ मिळेल.
निधी वितरणास उशीर का झाला?
- अर्थ खात्याने फेब्रुवारी महिन्यासाठी आवश्यक निधी महिला व बालकल्याण विभागाला वर्ग केला आहे.
- काही तांत्रिक कारणांमुळे निधी वितरण लांबले, यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.
- अखेर सरकारने यावर कारवाई करत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत मिळाले 10,500 रुपये
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 10,500 रुपये वितरित झाले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर महिलांना एकूण 12,000 रुपयांचा लाभ मिळेल.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा आठवा हप्ता अखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना मोठ्या प्रमाणावर लाभदायक ठरत आहे.