बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल झाली असून, ती कधीही बाळाला जन्म देऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. दीपिकासोबत तिच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील रुग्णालयात दाखल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी दीपिकाच्या या बातमीची आतुरतेने वाट पाहत असून, ती कोणत्याही क्षणी आई होणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं होतं, आणि आता सहा वर्षांनंतर त्यांचं कुटुंब वाढणार आहे. याआधी, दीपिकाच्या बाळाच्या जन्माची तारीख २८ सप्टेंबर असल्याचं अनुमान होतं, मात्र आता ती आगाऊ रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाल्यानंतर दीपिका पादुकोण हसतमुख चेहऱ्याने फोटोग्राफरांसाठी पोझ देताना दिसली होती, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अभिनेता रणवीर सिंह देखील या आनंदाच्या क्षणांसाठी दीपिकासोबत असल्याचं सांगितलं जात आहे. बॉलिवूडमधील हा स्टार कपल नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिला आहे आणि आता त्यांच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय चाहत्यांसाठी खास आहे.