दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांचे नाव प्रस्तावित केले आहे, आणि यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आपच आमदारांनी याच्या प्रस्तावाचं स्वागत केले असून, आतिशी येत्या दोन ते तीन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आतिशी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली तेव्हा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव पहिले चर्चेत होते. परंतु, त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर, आतिशी यांचे नाव पुढे आले आणि आता त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत.
आतिशी आम आदमी पार्टीमधील वरच्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर, केजरीवाल यांनी शिक्षण मंत्रालयासह सिसोदिया यांच्याकडील इतर महत्त्वाची खाती आतिशी यांच्याकडे सोपवली होती.
आतिशी कालकाजी विधानसभा मतदार संघाच्या आमदार आहेत आणि शीला दीक्षित यांच्यानंतर जवळपास एका तपानंतर दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री मिळणार आहे.