दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाला (AAP) मोठा हादरा बसला असून, पक्षाचे ८ आमदार भाजपात सामील झाले आहेत. या घडामोडींमुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, भाजपाला प्रचंड बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
कोण आहेत हे ८ आमदार आणि ते का गेले भाजपात?
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या ८ आमदारांची नावे आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे:
वंदना गौर (पालम)
रोहित मेहरौलिया (त्रिलोकपुरी)
गिरीश सोनी (मादीपुरी)
मदन लाल (कस्तुरबा नगर)
राजेश ऋषी (उत्तम नगर)
बीएस जून (बिजवासन)
नरेश यादव (मेहरौली)
पवन शर्मा (आदर्श नगर)
यातील ७ आमदारांना AAP ने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले होते, त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांचे तिकीट जाहीर झाले होते, मात्र एका गुन्ह्यातील सहभागामुळे त्यांनी ते परत केले आणि त्यांच्या जागी महेंदर चौधरी यांना संधी देण्यात आली.
भाजपात प्रवेश आणि जोरदार हल्लाबोल!
या आठ माजी आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजप प्रमुख विरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना पांडा यांनी, “दिल्ली AAPda मुक्त होणार!” असा जोरदार टोला लगावत, “भाजपच दिल्लीसाठी सर्वोत्तम पर्याय” असल्याचा दावा केला.
AAP सोडताना आमदारांनी केजरीवालांवर गंभीर आरोप केले:
“आता आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही.” – वंदना गौर आणि मदन लाल
“AAP मध्ये अंतर्गत लोकशाही नाही, पक्षातील कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जात नाही.” – रोहित मेहरौलिया
दिल्ली निवडणूक – कोण मारणार बाजी
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
AAP – सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याच्या प्रयत्नात
भाजप – २७ वर्षांपासून सत्तेबाहेर, परंतु आता नव्या संधीच्या शोधात