मोखाडा (ता. २५): शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा समन्वय साधला तरच खऱ्या अर्थाने माणूस पूर्णत्वाला पोहोचतो. राष्ट्रहिताला सर्वोच्च मानून कर्तव्य पार पाडल्यासच धर्म, अर्थ, काम, मोक्ष साध्य होऊ शकतात, असे प्रतिपादन प्रा. साहेबराव धनवटे यांनी केले.
ते पं. दीनदयाळ उपाध्याय हीरक महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात “एकात्म मानव दर्शन” या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ निदेशक विजय खंदारे होते.
धनवटे म्हणाले की,
- हक्कांइतक्याच कर्तव्याबाबतही जबाबदार राहणे गरजेचे.
- व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तिन्ही स्तरावर समन्वय साधल्यासच सर्वांगीण विकास शक्य.
- दीनदयाळ उपाध्यायांचे तत्त्वज्ञान हे केवळ विचार न राहता जीवनाचे आचारधर्म आहे.
- आजच्या काळात आत्मनिर्भरता आणि पर्यावरणाचा समतोल अत्यावश्यक.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण सरगर यांनी केले. विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.