महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी दणदणीत विजय मिळवत मोठा इतिहास घडवला आहे. त्यांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांचा तब्बल 40,463 मतांनी पराभव केला आहे. या विजयानंतर सरोज अहिरे यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची माळ आपल्या गळ्यात घातली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
योगेश गोलप यांना तिसऱ्या स्थानावर समाधान:
या निवडणुकीत त्रिकोणी सामना पाहायला मिळाला, मात्र महायुतीचे उमेदवार राजश्री अहिरराव दुसऱ्या स्थानावर राहिले, तर अपक्ष उमेदवार योगेश गोलप यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सरोज अहिरे यांची विजयानंतरची प्रतिक्रिया:
निवडणुकीच्या निकालानंतर सरोज अहिरे यांनी पहिली प्रतिक्रिया . त्या म्हणाल्या, “आज देवळालीच्या सर्व मायबाप जनतेने मला मोठ्या विश्वासाने साथ दिली आहे. या विजयामागे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे. गेल्या महिन्याभरापासून सर्वांनी मतदारसंघात सातत्याने मेहनत घेतली. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्रपक्षांचे योगदानही महत्त्वाचे ठरले. शेतकरी बांधव, तरुण वर्ग, महिला आणि संपूर्ण जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानते.”
विकासाची गंगा अविरत सुरू राहील:
सरोज अहिरे यांनी आपल्या विजयाचे श्रेय जनतेला दिले असून, विकासाला मिळालेला कौल हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या,
हा विजय माझ्या मायबाप जनतेचा आहे. त्यांनी मला दिलेला कौल विकासासाठी आहे. मला दिलेला हा विश्वास मी कायम ठेवेल. विकासाची गंगा अविरत सुरू राहील, आणि मी सर्वांशी एकनिष्ठ राहून जनतेसाठी काम करीन.”
विजयानंतर मतदारसंघात उत्साह:
सरोज अहिरे यांच्या विजयामुळे देवळाली मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीमुळे महायुतीतील पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद असून, या विजयाचा नवा अध्याय मतदारसंघाच्या राजकारणात लिहिला गेला आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- सरोज अहिरे यांचा दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजय.
- विरोधकांवर 40,463 मतांनी मोठा विजय.
- विकासाचे आश्वासन आणि जनतेचा विश्वास टिकवण्याचा निर्धार.
- निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण.