वैद्यकीय कारणास्तव राजीनामा – धनंजय मुंडे (Dhananjay Munde)
Dhananjay Munde – आज धनंजय मुंडे यांनी आपले मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये या संदर्भात माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “मी वैद्यकीय कारणास्तव माझा राजीनामा दिला आहे.” त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील तणाव
धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही आपली पहिल्यापासूनची ठाम मागणी असल्याचे सांगितले. तसेच काल समोर आलेले फोटो पाहून मन व्यथित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. परळी शहरातही तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
राजकीय घडामोडींवर लक्ष
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या राजीनाम्याचा पुढील राजकीय परिणाम काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.