Vidhan Sabha Election 2024 : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात असणार 303 मतदान केंद्रे.३ लाख ४३ हजार ५७६ मतदार

03 Polling Stations to Serve 343,576 Voters in Nashik Central Assembly Constituency

Latest News : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात 303 मतदान केंद्रे असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिक मध्य मतदारसंघात 3 लाख 43 हजार 576 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्पित चौहान यांनी दिली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

निवडणूक कार्यक्रम असा-
नामनिर्देशन पत्र दाखल करणे- मंगळवार २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी- बुधवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून संबंधित निवडणूक अधिकारी यांच्य कार्यालयात, उमेदवारी अर्ज मागे घेणे- ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात, मतदानाचा दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल,

124-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 74 हजार 344 पुरूष मतदार, 1 लाख 69 हजार 175 स्त्री मतदार आणि 57 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 43 हजार 576 मतदार आहेत. तसेच सैनिक मतदार संख्या 107 इतकी असून यात पुरूष मतदार 101 व स्त्री मतदार 6 आहेत. -नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर येथे होणार आहे.