दिंडोरी तालूक्यातील पाञ लाभार्थी दिव्यांग बांधवांचे रेशन कार्ड ऑनलाइन करून अंत्योदय योजनेंतर्गत स्वत धान्य दुकानात रेशन व संजय गांधी योजने अंतर्गत पेशन वेळेत देण्यात यावी अन्यथा पुरोगामी दिव्यांग सेवा समिती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दिंडोरी तालूक्यातील दिव्यांगाना गेल्या दोन वर्षांपूर्वी अंत्योदय योजनेंतर्गत पिवळी शिधा पञिका देण्यात आली असून, अद्याप पर्यंत अंत्योदय योजनेतंर्गत पुरवठा विभागाच्या वतीने पाञ दिव्यांग बांधवांचे प्राधान्याने ऑनलाइन झाले नसल्याने, स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळत नाही. अनेक दिव्यांग कुटुंबियांना उदरनिर्वाहचे साधन नाही, व धान्य देखील देखील मिळत नसल्याने व त्याचप्रमाणे संजय गांधी योजनेतंर्गत गेल्या चार महिन्यापासून मासिक पेंशन मिळालेली नाही.व ज्या दिव्यांग बांधवांनी नव्याने अर्ज केलेल्या,लाभार्थांना देखील एक वर्ष झाले माञ पेशंन सुरू करण्यात आलेली नाही.
दिव्यांग बांधवाच्या न्यायीक मागण्या बाबत दखल घेण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा पुरोगामी पञकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने, निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आला आहे.
यावेळी पुरोगामी दिव्यांग सेवा समिती राज्य अध्यक्ष सुकदेव खुर्दळ, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालूका अध्यक्ष जयवंत थेटे, चंद्रभान बोरस्ते राजेद्र शिंपी,विलास कदम,आदीसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते