Latest News : दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ आदिवासी जमाती (एसटी) साठी राखीव असला तरी राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नारहरी झिरवाळ यांनी तब्बल १,२४,०८४ मते मिळवत विजय मिळवला होता. यंदा झिरवाळ (Narhari Zirwal) अजित पवार गटात सामील झाले असून, पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मतदारसंघात सध्या विकासकामांचा मुद्दा चर्चेत आहे, विशेषतः रस्ते, वीज, पाणी आणि शेतमालाला योग्य भाव मिळवण्याचे प्रश्न राजकीय केंद्रस्थानी आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), तसेच इतर पक्षांचे उमेदवार देखील या मतदारसंघातून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पंधरा ते सोळा उमेदवार निवडणूक लढवणार असले तरी खरी लढत दोन प्रमुख गटांमध्ये होणार असल्याचे संकेत आहेत.
विकासाच्या प्रश्नावर निवडणूक जिंकण्याची धडपड सुरू झाली असून, मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांवर सगळ्यांचे लक्ष आहे.