ST Corporation : एसटी महामंडळाची दिवाळीत मोठी घोषणा: हंगामी भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

**Headline:** Saptashring Ghat Navratri Festival: State Transport Launches 300 Additional Bus Services for Pilgrims

Latest News : एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीत लागू केली जाणारी १० टक्के हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्यात आली आहे. ही वाढ २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान लागू होणार होती, परंतु आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाला या भाडेवाढीमुळे मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नसली, तरी प्रवाशांना प्रवासाचे दर ‘जैसे थे’च राहतील, त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास महाग होणार नाही.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

याशिवाय, मुंबई-पुणे मार्गावरील ई-शिवनेरी बस सेवेत विमानातील हवाई सुंदरी प्रमाणेच शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या तिकिटांवर कोणताही अतिरिक्त शुल्क न लावता, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.

तसेच, एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्थानिक पदार्थ विकण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, २५०० नवीन साध्या बसेस खरेदी करणे आणि १०० डिझेल बसेसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे यासंबंधीच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून, मुंबईतील पाचही टोल नाक्यांवरून लहान मोटार वाहनांना टोल माफी देण्यात आली आहे. १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.