महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ दौऱ्यावर

*महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारीचा आढावा दौरा

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, आणि डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आज, ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिष्टमंडळाने विविध अंमलबजावणी यंत्रणांशी बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्य सचिवांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनी या बैठकीत आपले सविस्तर अहवाल सादर केले. यावेळी, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

शिष्टमंडळाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या सूचनाही घेतल्या. राजकीय पक्षांनी मतदारयाद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांच्या सुविधांची सुधारणा, तसेच निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

निवडणूक आयोगाने सर्व संबंधित यंत्रणांना निवडणुकीची तयारी गतीने व सुरक्षिततेने करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply