ट्रक चोरीचा मास्टरमाइंडने असा रचला कट
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Fake truck robbery : ट्रक चोरीचा बनाव करून तब्बल सात लाख रुपयांच्या भंगार मालावर डल्ला मारण्याचा कटच ट्रक मालकानेच रचल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील द्वारका परिसरातून चोरला गेलेला ट्रक व त्यातील भंगार माल गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने उघडकीस आणला असून, प्रमुख आरोपीसह दोघांना लळींग टोलनाक्यावर अटक करण्यात आली आहे.
ट्रक चोरीचा मास्टरमाइंड: प्रकरणात धक्कादायक वळण
३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता द्वारका वजन काटा, वडाळा नाका येथून टाटा कंपनीचा भंगार भरलेला ट्रक चोरीस गेला होता. याबाबत फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या सूचनेनुसार आणि उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.
ट्रक मालकच निघाला चोरीचा मास्टरमाइंड (Fake truck robbery)
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी सालीम शेख व नाविद शेख यांना धुळे येथील लळींग टोलनाका येथे सापळा रचून अटक केली.Fake truck robbery चौकशीत त्यांनी ट्रक मालक साहिल शेख यांच्या सांगण्यावरून हा बनाव रचल्याची कबुली दिली. त्यांनी ट्रक स्क्रॅप करून व त्यातील भंगार दुसऱ्या ट्रकमधून जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीत विकल्याचे सांगितले. त्याबदल्यात मिळालेल्या सात लाख रुपयांपैकी सालीम शेखकडून तीन लाख रुपये हस्तगत करण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि हिरामण भोये, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, तसेच पथकातील इतर अधिकाऱ्यांनी केली.