शेतकऱ्यांनी शेतीसोबत पुरक व्यवसाय करावाच – मोहन वाघ

IMG 20241112 WA0002

शेतकऱ्यांनी शेतीसोबत पुरक व्यवसाय करावाच – मोहन वाघभऊर येथे पार पडलेल्या कृषीमित्र ग्रुपच्या शेतकरी स्नेहमेळाव्यात प्रतिपादनसतत नैसर्गिक संकटाचा सामना, शासनाचे बे भरवाशाचे धोरणे, तसेच औषधे, बियाणे आणि खतांच्या वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागतो, मात्र शेतकऱ्यांनीही न डगमगता शेतीसोबत एक पुरक व्यवसाय हा करावाच असे मार्गदर्शन सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. समन्वयक वरिष्ठ पत्रकार सचिन वाघ यांनी शेतकऱ्यांचा व्हाँटसअँपच्या माध्यमातुन दहा वर्षापुर्वी तयार केलेल्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी कृषीमित्र ग्रुपचा वार्षिक स्नेहमेळावा देवळा तालुक्यातील भऊर येथील स्वप्निल अँग्रो येथे आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये वर्षभरात जो शेतकरी इतर शेतकऱ्यांना शेतीबाबत चांगले मार्गदर्शन करेल त्याला विकास सिंह यांच्या वतीने ११ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देवुन गौरविण्यात येते.तर यंदापासुन पुर्वा केमिकल्सचे संजय पवार यांच्या वतीने गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी १० हजार रुपयांची मदत करण्यात येते.यंदा कृषीमित्र ग्रुप प्रेरणा हा पुरस्कार सिध्द पिंप्री येथील शेतकरी शंकर ढिकले यांना देण्यात आला, तर दुगाव येथे श्रध्दा क्षिरसागर या दहावीच्या विद्यार्थींनी तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.तसेच मेळाव्यात हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी आगामी थंडी, पाऊस आणि शेती यावर मार्गदर्शन केले. तर स्वप्निल अँग्रोचे अध्यक्ष अरुण पवार यांनी शेतकऱ्यांनी पोल्ट्रीसारख्या जोड व्यवसायात उतरुण प्रगती साधावी असे सांगितले. तर पुर्वा केमिकल्सचे एम डी संजय पवार यांनी शेतकऱ्यांसाठी वर्षातुन दोनदा मेळावा आयोजित करुन कृषी पर्यटनासारखा व्यवसाय करावा जेणेकरुन शेतकऱ्यांना नैसर्गिक संटकातुन सावरता येईल. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक कैलास शिरसाठ, डाँ. रामनाथ जगताप, डाँ.सतिश भोंडे,सदुभाऊ शेळके, शंकर ढिकले, भुषण निकम, आबा आहेर, भाऊसाहेब वाघ, हंसराज वडघुले, संदिप मगर, वैभव पवार, बाळासाहेब देवरे,संदिप वाघ कांदा द्राक्षे मका टोमॅटो या पिकांचे उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.