Shirdi (दि. 21 फेब्रुवारी) – शिर्डी (Shirdi) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावळीविहीर बुद्रुक येथे शुक्रवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी वाहनात कोयते आणि चॉपर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Shirdi पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले
घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केल्याने दोन्ही गटातील युवकांनी चारचाकी वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन वाहन ताब्यात घेतले आणि त्यामधील कोयते व चॉपर जप्त केले. अद्याप कोणत्याही व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांकडून दोन्ही गटातील युवकांचा शोध सुरू आहे, तसेच या राड्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शिर्डीत (Shirdi) 80 भिक्षेकरी ताब्यात, भिक्षेकरीगृहात रवानगी
शिर्डीत साईसंस्थान, पोलिस यंत्रणा आणि नगरपरिषदेच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी पकडण्याची कारवाई राबविण्यात आली. या मोहिमेत 80 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करून भिक्षेकरीगृहात पाठवले जाणार आहे. शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन अधिक सतर्क झाले असून, त्याचा एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात आली.
ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टर पेटवले
शुक्रवारी संध्याकाळी शिरपूर तालुक्यातील गिधाडे-बाळदे रस्त्यावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अर्थे गावातील मालुबाई कांतीलाल शिरसाट या महिलेचा गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टर पेटवून आपला रोष व्यक्त केला.
शिर्डी पोलिसांकडून पुढील तपास सुरू
शिर्डी आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांचा तपास वेगाने सुरू केला असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.