Gangapur police crime investigation : “नाशिक-पुण्यातील १० साखळी व दुचाकी चोरी प्रकरणांचा उलगडा: गंगापुर पोलिसांची मोठी कारवाई”

Gangapur police crime investigation

११.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी आणि तीन अल्पवयीन मुलांना अटक

नाशिक, १४ एप्रिल २०२५ (प्रतिनिधी) Gangapur police crime investigation : गंगापुर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नाशिक आणि पुणे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत एकूण १० गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या कारवाईत एकूण ११ लाख २३ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


शांतिनिकेतन चौकात महिलेला लुटले, तपासाने उघडल्या अनेक गुन्ह्यांच्या फाईली

२९ मार्च २०२५ रोजी घडलेली घटना तपासात महत्त्वाची ठरली

दि. २९ मार्च रोजी सायंकाळी ७:१५ वाजता गंगापुर रोडवरील शांतिनिकेतन चौकात एका महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोनसाखळी हिसकावून आरोपी पसार झाले. यावरून दाखल गुन्ह्याच्या तपासात, पोलीस अंमलदार रविंद्र मोहीते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई सुरू करण्यात आली.


गुन्हे शोध पथकाने केली यशस्वी कारवाई

वरिष्ठ निरीक्षक राजपूत व पोउनि पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन

गंगापुर पोलिसांनी शहरात सापळा रचून खालील चार आरोपी व तीन विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलांना अटक केली:

  1. अक्षय सुनिल बोरकर (१९, रा. शिवाजीनगर, नाशिक)
  2. राज सखाहरी गायकवाड (१९, रा. भवानी चौक, नाशिक)
  3. परवेझ उर्फ सोनु जावेद मनियार (२४, रा. शिवाजीनगर, नाशिक)
  4. विलास प्रमोद विसपुते (३९, रा. खुटवडनगर, नाशिक)

टोळीने कबूल केलेले गुन्हे

नाशिक व पुण्यातील पोलिस ठाण्यांमध्ये नोंद

टोळीने खालील ठिकाणी ८ साखळी चोरी व २ मोटारसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले:

  • नाशिक – गंगापुर, इंदिरानगर, सरकारवाडा, भद्रकाली, म्हसरूळ
  • पुणे जिल्हा – दौंड, चंदननगर

जप्त मुद्देमालाची माहिती

एकूण किंमत: ११,२३,६८८ रुपये

  • ६ सोन्याच्या साखळ्या – ८० ग्रॅम (सुमारे ५.८ लाख रुपये)
  • २ मोटारसायकली – बजाज पल्सर व टीव्हीएस रायडर (२.२ लाख रुपये)
  • हस्तगत होण्यास बाकी असलेले सोनं – अंदाजे ३.२ लाख रुपये

पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक

या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, तसेच सहायक आयुक्त नितीन जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तपासाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत करत असून, पुढील तपास पोउनि मोतीलाल पाटीलपो. अं. तुषार मंडले करीत आहेत.