सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करणारा फरार आरोपी पश्चिम बंगालमधून जेरबंद
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कारवाई
Gold jewelry embezzlement : सोन्याच्या दागिन्यांच्या अपहार प्रकरणात तब्बल काही काळ फरार असलेल्या आरोपीला अखेर नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.
आरोपीची ओळख आणि गुन्ह्याचा तपशील
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित सुकदेव भुनिया (वय ३८) असून तो मुळचा रबिदासपूर, पो. स्टे. दासपूर, जि. पश्चिम मेदीनीपूर, पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. आरोपी सध्या मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक येथे राहत होता.
या प्रकरणात संगिता सतिष माळवे (वय ३५, रा. मखमलाबाद नाका, नाशिक) यांनी फिर्याद दिली होती, त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी अमित भुनिया फरार झाला होता.
gold jewelry embezzlement : गुप्त माहितीवर कारवाई, माओवादी प्रभाव असलेल्या भागातून अटक
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, आणि सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी पश्चिम बंगालच्या मेदीनीपूर जिल्ह्यातील रबिदासपूर गावात लपलेला आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पश्चिम बंगाल गाठले.
हा परिसर माओवादी प्रभावाखाली असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने १९ फेब्रुवारी रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने सहा दिवसांचे ट्रान्झिट वॉरंट मंजूर केले.
आरोपी नाशिक पोलिसांच्या ताब्यात
आरोपीला २२ फेब्रुवारी रोजी नाशिकला आणण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पोलीस पथकाने केली आहे.