Nashik News (दिंडोरी) Guillain Barre Syndrome News: वारे (ता. दिंडोरी) येथील शामलाताई बिडकर आश्रमशाळेतील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थिनी गायत्री विलास गायकवाड हिचा संशयित Guillain Barre Syndrome (GBS) या दुर्मिळ आजारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
GBS आजार म्हणजे काय?
Guillain Barre Syndrome हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे, ज्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे अंग बधीर होणे, स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात.
गायत्री गायकवाड हिचा GBS आजाराने मृत्यू? (Guillain Barre Syndrome News)
गायत्री (रा. देवपाडा, करंजाळी) ही २७ जुलै रोजी रात्री आपल्या बहिणीशी फोनवर बोलत होती, त्यावेळी तिने पोटदुखीची तक्रार केली होती. दुसऱ्या दिवशी (२८ जुलै) सकाळी कमरेखाली शरीर बधीर होण्याची लक्षणे दिसून आली. पालक आणि शिक्षकांनी तत्काळ तिला भनवड व नंतर वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ३० जुलै रोजी तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अखेर उपचार सुरू असताना १ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत तिच्या मृत्यूमागे Guillain Barre Syndrome हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता
या घटनेनंतर नाशिकमधील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की इतर विद्यार्थ्यांमध्ये GBS ची लक्षणे दिसून आलेली नाहीत. तरीही पालकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आणखी एका विद्यार्थिनीचा आकस्मिक मृत्यू
गांडोळे येथील शासकीय आश्रमशाळेतील नववीच्या माया संदीप भोये (वय १५) या विद्यार्थिनीचा देखील प्रार्थनेसाठी उभ्या असताना अचानक मृत्यू झाला. तिला ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
Guillain Barre Syndrome संदर्भात उपाययोजना सुरू
भनवड आश्रमशाळेतील घटनेनंतर GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले असून स्थानिक आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.