thrilling action Gujarat drug seizure : गुजरात समुद्रात १८०० कोटींचा ड्रग्ज साठा पकडला – कोस्ट गार्ड व ATS ची मोठी कारवाई

Gujarat drug seizure

३०० किलो एमडी ड्रग्जसह बोट जप्त, पाकिस्तानहून येणारी बोट सिनेस्टाईल पाठलागात पकडली

Gujarat drug seizure : गुजरातच्या समुद्रात एका बोटीतून तब्बल ३०० किलो मेथॅम्पेटामिन (MD ड्रग्ज) जप्त करण्यात आले असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे १८०० कोटी रुपये इतकी आहे(Gujarat drug seizure). ही कारवाई भारतीय तटरक्षक दल (Coast Guard) आणि गुजरात ATS ने संयुक्तरित्या केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


पाकिस्तानहून येणाऱ्या बोटीचा समुद्रात पाठलाग

प्राथमिक माहितीनुसार, ही बोट महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र सीमेवर रात्रीच्या वेळी पकडण्यात आली. संशयित बोट पाकिस्तानच्या दिशेने समुद्रातून येत होती. कोस्ट गार्डच्या स्पीड बोट्स आणि जहाजांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करत या बोटीला थांबवले.

तपासणीदरम्यान बोटीत मोठा ड्रग्ज साठा (Gujarat drug seizure) आढळून आला. या कारवाईमुळे भारतामध्ये होऊ शकणारी मोठी ड्रग्ज घुसखोरी टळली आहे, असे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले.


मासेमारीच्या नावाखाली ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

उक्त बोट पश्चिम बंगालमधील काकद्वीप मासेमारी बंदरात नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे. परंतु तपासणीदरम्यान बोटीकडे वैध कागदपत्रांची कमतरता होती. १४ भारतीय क्रू सदस्यांपैकी कोणाकडेही मासेमारीसाठी लागणारी अधिकृत कागदपत्रे नव्हती.

या बोटीचा वापर मासेमारीच्या आडून ड्रग्ज तस्करीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी सर्व क्रू सदस्यांना ताब्यात घेतले असून, सखोल तपास सुरु आहे.


सुरक्षा दलांची सतर्कता – सीमारेषेवर मोठा स्फोट टळला

या मोठ्या कारवाईमुळे भारतीय समुद्री सुरक्षेचे महत्व अधोरेखित झाले आहे. पाकिस्तानहून येणाऱ्या बोटीमुळे देशात ड्रग्ज नेटवर्क वाढवण्याचा कट होता, जो तात्काळ कारवाईमुळे हाणून पाडण्यात आला.