Nashik : नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पहाटे कोटंबी घाटात संशयास्पद वाहन थांबवून त्यामध्ये सुमारे ४.८७ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मनीष चौधरी आणि सहायक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी ही मोहीम राबवली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या वाहनाची तपासणी करण्यात आली.
वाहन क्रमांक (एमएच १४ केए २१८५) मध्ये सुगंधित तंबाखूच्या १३ गोण्या आणि ५०० ग्रॅम वजनाची ८० पाकिटे सापडली. वाहनातील व्यक्तींनी आपली ओळख जसप्रीत सिंह आणि सरदार वजीर सिंह (हरयाणा) अशी सांगितली.
या कारवाईत नमुने घेऊन उर्वरित साठ्यासह वाहन जप्त करण्यात आले. एकूण १५.८४ लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.