नवी दिल्ली (MBC मराठी) – सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (HAL) खरेदी (भारतीय) श्रेणी अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या (IAF) Su-30 MKI विमानांसाठी, सर्व कर आणि शुल्कांसहित २६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाची २४० एरो-इंजिन (AL-31FP) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या एरो-इंजिनचा पुरवठा एक वर्षानंतर सुरू होणार असून आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Su-30 MKI हे भारतीय वायू दलाच्या सर्वात शक्तिशाली आणि सामरिकदृष्ट्या-महत्त्वाच्या ताफ्यातील एक विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे या एरो-इंजिनांचा पुरवठा भारतीय वायू दलाला आपल्या मोहीमा विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकट करण्यासाठी त्यांच्या ताफ्याच्या निर्वाहाची आवश्यकता पूर्ण करेल.
एरो-इंजिनच्या काही प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे इंजिनांमध्ये ५४ टक्के पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असेल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कोरापुट विभागात या एरो-इंजिनचे उत्पादन केले जाणार आहेत..