*बदलापूर: बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील फरार असलेल्या सहआरोपी, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी कर्जत येथे गजाआड केले आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांनी या दोन्ही आरोपींवरून सरकारवर टीका केली होती. दीड महिन्यांच्या फरारी नंतर आज पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता.
आता या आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून, या प्रकरणात मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीसंबंधीची याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या संदर्भात काही महत्त्वाचे खुलासे अपेक्षित असल्याची माहिती दिली आहे.