Horoscope Today आजचे राशीभविष्य सोमवार, 31 ऑक्टोबर 2024.

/todays-horoscope-monday-22-10-2024/

बुधवार, 30 ऑक्टोबर 2024. अश्विन कृष्ण त्रयोदशी.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहू काळ – दुपारी 12 ते 1:30

आज त्रयोदशी वर्ज दिवस.आज जन्मलेल्या बाळाची विष्टि करण शांती करून घेणे.

30 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.

  शैक्षणिक क्षेत्र किंवा व्यवस्थापकीय क्षेत्र यात तुम्ही चमकता. तुम्ही शांत व प्रामाणिक आहात .तुम्ही कृतिशील असला तरी अस्वस्थ असतात .तुमच्यात अभिमान तपस्या व महत्त्वकांक्षा असते. धर्मादाय संस्था, मूकबधिर अपंगांसाठी संस्था यामध्ये काम करण्याची आवड असते. आणि त्यापासून मोबदल्याची अपेक्षाही नसते. वयाच्या 30 वर्षानंतर भाग्योदय होतो. समाजप्रिय असून सिनेमा नाटके ,प्रवास इत्यादीची आवड असते .कला व संगीत यामध्ये गती असून घराची सजावट उत्तम तरीनी करता. 
   तुम्ही महत्त्वाकांक्षी असून

मान मरातब व प्रतिष्ठा जपता. स्वतःच्या ज्ञानावर विश्वास असतो .धार्मिक गोष्टीची ओढ असते परंतु त्याकडे डोळसपणाने पाहता .न्यायाची आवड असते .दुसऱ्याच्या भल्यासाठी कष्ट करायला तुम्ही तयार असतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते .तुमच्या दिमाख, टापटीप ,व्यवस्थितपणा व काटेकोरपणा आहे. अडचणीत आलेल्याना तुम्ही मदत करता. तुमच्यातील कौशल्य बुद्धी आणि कृती दोन्हीत आढळते. तुम्हाला खेळण्याची हौस असते. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे पूर्वनियोजन तुम्ही करता. तुमच्या दृष्टिकोन विशाल असतो ,सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो. प्रेम संबंधात दुसऱ्याकडून होकार असला तरच पुढे पाऊल टाकता. उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवर योग्य मार्ग शोधतात.स्वतःच्या चाणक्य व धूर्त स्वभावामुळे आपली नोकरी व धंदा व्यवस्थितपणे सांभाळून उत्तम मोबदला मिळतो .आपले जीवन आरामदायी जाईल याकडे तुमचे लक्ष असते .पैशाने जेवढी सुखी उपभोक्ता येतात तेवढी त्याचा आनंद लुटता. तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असता. तुम्हाला आपल्या घराबद्दल आपलेपणा आहे पण ओढ नसते .टापटीप आवडत असली तरी तुम्ही स्वतः कष्ट घेत नाही, दुसऱ्यांकडून कामे करून घेता.इच्छाशक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते .तुमचा स्वभाव हरहुन्नरी असतो ,तसेच लहरी आणि हळवाही असतो. आपल्या पतीला सर्व प्रकारे योग्य ती साथ देण्यात तुम्हाला अभिमान वाटतो .तुम्ही प्रेमळ निष्ठावान व चांगली सहधर्मचारिणी म्हणून लौकिक मिळवता.

शुभ दिवस- मंगळवार ,गुरुवार शुक्रवार

शुभ रंग :-पिवळा ,जांभळा हिरवा

शुभ रत्ने:- पुष्कराज,अमेस्थिस्ट

आजचे राशिभविष्य

मेष:- आज धार्मिक समारंभात सहभाग नोंदवाल. कनिष्ठां कडून सहकार्य मिळेल.

वृषभ:- आज शेअर्स मधून लाभ होतील.कलाकारांना उत्तम कालावधी.

मिथुन:- आज वाहन सौख्या चा.नवीन खरेदी होईल.घरात सजावटीसाठी खर्च कराल.

कर्क:- आज भावंडाकडून लाभ होतील.आनंदी मूड राहील.कलाकौशल्य दिसेल.

सिंह:- आज सुरुची पदार्थांचा आस्वाद घ्याल.गुरुकृपा राहील.

कन्या:- आज तुमच्याच राशीत चन्द्र शुक्र लाभ योग होत आहे.स्वतःसाठी खर्च कराल.मौजमजा कराल.

तुळ:- आज उत्तम धनप्राप्ती होईल.आरोग्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक:- आज अत्यंत सुंदर दिवस.आनंद आणि समाधान देईन. सामाजिक क्षेत्रात यश लाभेल.उत्साह वाढेल.सर्व प्रकारचे लाभ होतील.

धनु:- आज छान दिवस.कामे मार्गी लागतील.अंदाज बरोबर ठरतील.कामात वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल.पती खूष असतील.

मकर:- आज उच्च शिक्षणात यश मिळेल. धार्मिक सहली होतील.जोडीदारासोबत दूरचे प्रवास आखले जातील.

कुंभ:- आज तब्येतीची काळजी घ्या. जोडीदारामार्फत लाभ होतील.

मीन:- आज छान दिवस.प्रेमीकाना यश.विवाह इच्छुक तरुण-तरुणींना खूष खबर मिळेल.

सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.