Illegal Brothel : धुळे: उच्चभ्रू सोसायटीत अवैध कुंटणखान्यावर छापा, पोलिसांची मोठी कारवाई

IllegalBrothel

धुळे: शहरातील देवपूर भागात उच्चभ्रू वसाहतीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर Illegal Brothel स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या प्रकरणी दोन तरुण आणि कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

धुळे शहरात गेल्या काही महिन्यांपासून लॉज आणि निवासी सोसायट्यांमध्ये अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. देवपूर परिसरातील काही उच्चभ्रू वसाहतींमध्ये अशा प्रकारचे कुंटणखाने Illegal Brothel सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. यानंतर निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाईची आखणी केली.

चार महिन्यांपासून सुरु होता अवैध व्यवसाय

पोलिसांच्या तपासानुसार, देवपूर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत एक महिला चार महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर घर घेऊन अवैध कुंटणखाना चालवत होती. छापा टाकला असता गौरव लोटन महाजन (रा. वरखेडी) आणि सौरभ राजेंद्र देवरे (रा. वरखेडी) हे दोन तरुण महिलांसोबत आढळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांनाही अटक केली आणि तीन पीडित महिलांची सुटका केली.

कुंटणखाना Illegal Brothel चालवणाऱ्या महिलेसह आरोपींवर गुन्हा दाखल

देवपूर पोलीस ठाण्यात कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह दोघांवर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवपूर पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका

ही महत्वपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी-धुळे शहर उपविभाग राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि. श्रीकृष्ण पारधी, अमित माळी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संदीप पाटील, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे, शिला सुर्यवंशी, राजीव गिते, गुलाब पाटील, तसेच भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, प्रियंका उमाळे आणि मोनाली सैंदाणे यांनी केली.

धुळे पोलिसांची अवैध व्यवसायांविरोधात कठोर भूमिका

धुळे शहरात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. नागरिकांनीही अशा अनैतिक कृतींबाबत तक्रार केल्यास त्वरित कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.