नाशिक रोड येथे आय.एस.पी/सी.एन.पी वेल्फेअर फंड कमिटीच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पोलीस स्टेशन शेजारील मुख्य गेट मैदानावर जेजुरी गडाचा भव्य देखावा उभारण्यात आला असून, याप्रसंगी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची आरती करण्यात आली.यावेळी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर उपाध्यक्ष राजेश टाकेकर रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे अशोक पेखळे अण्णा सोनवणे सुधीर पगारे आप्पाजी जगताप श्रीपाद काजळे मुरलीधर जगताप दत्तात्रय टिळे मच्छिंद्र जाधव अशोक अहिरे संतोष शिरसाठ यांच्यासह आय.एस.पी/सी.एन.पी वेल्फेअर फंड कमिटी आय.एस.पी मजदूर संघ स्टाफ वर्क कमिटी एम्प्लॉईज सोसायटी ई.पी.एफ/पी.एफ नवी दिल्ली चे सर्व पदाधिकारी, नेते व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकत्र येऊन संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकात्मता आणि धार्मिक उत्सवाचे महत्व अधोरेखित केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.