Nashik Police : नाशिक पोलीसांची अचानक कारवाई: टवाळखोरांवर कारवाई, ६९,५०० रुपयांचा दंड वसूल नाशिक शहरात सोनसाखळी चोरी प्रतिबंधासाठी पोलिसांनी राबवली विशेष मोहीम. ४६१ जणांवर कारवाई आणि १ लाखाहून अधिक दंड वसूल. टवाळखोरांवर पोलिसांचा वचक वाढवण्याचा प्रयत्न.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक: नाशिक शहरातील चैनस्नॅचींग गुन्हे रोखणे आणि सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या इसमांवर वचक बसवण्यासाठी नाशिक पोलीस नाशिक पोलीसांची अचानक कारवाई: टवाळखोरांवर कारवाई, ६९,५०० रुपयांचा दंड वसूल आयुक्तालयाच्या हद्दीत ‘स्टॉप अँड सर्च’ मोहिम राबविण्यात आली. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्यांनी ही विशेष कारवाई केली.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आणि परिमंडळ १ व २ चे पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक पोलीस आयुक्त (पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड विभाग) यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
६९,५०० रुपयांचा दंड वसूल – नाशिक पोलिसांचे Nashik Police मोठे पाऊल
परिमंडळ १:
२३३ उपद्रवी इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अंतर्गत कारवाई.
२३२ संशयित वाहने तपासली; त्यावरून ३२,००० रुपयांचा दंड वसूल.परिमंडळ २:
२२८ उपद्रवी इसमांवर कारवाई.१७० संशयित वाहने तपासून ३७,५०० रुपयांचा दंड वसूल.
एकूण ४६१ उपद्रवी इसमांवर कारवाई
९६ संशयित वाहनांवर ६९,५०० रुपयांचा दंड
नाशिक पोलीसांनी Nashik Police स्पष्ट केले की यापुढेही वेळोवेळी अचानक ‘स्टॉप अँड सर्च’ मोहिम राबविली जाणार आहे. संशयित वाहने, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे इसम, तसेच चैनस्नॅचींगसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सतत कारवाई केली जाईल.
नाशिक पोलिसांच्या Nashik Police या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे, तर उपद्रवी इसमांना कठोर कारवाईचा इशारा दिला गेला आहे.
हे पण वाचा : नाशिक: २ हजारांची लाच घेताना दोन पोलिस अधिकारी अटकेत