IT Park : “आडगावमध्ये उभे राहणार 335 एकरावर अत्याधुनिक आयटी पार्क”

Nashik IT Park Manjuri

नाशिकः नाशिक शहरासाठी आयटी पार्क IT Park हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान या विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयटी पार्क विकसित करण्याची घोषणा केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

IT Park : “आडगावमध्ये उभे राहणार 335 एकरावर अत्याधुनिक आयटी पार्क”

आडगाव शिवारात 335 एकर जागेवर प्रस्तावित आयटी पार्कसाठी 40,000 चौरस मीटर जागा नाशिक महानगरपालिकेने अधिग्रहित केली आहे. लवकरच या प्रकल्पासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती होणार असून आधुनिक आयटी पार्क उभारले जाईल. या घोषणेमुळे नाशिकमधील तरुणांना बेंगळुरू, पुणे, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागणार नाही आणि स्थानिक पातळीवर रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या निर्णयाबद्दल नाशिककरांनी मनापासून आभार मानले आहेत. या प्रकल्पामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळेल आणि शहराचे आयटी हबमध्ये रुपांतर होण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असेल.

He Pan Wacha : Nashik : गुन्हेशाखेची कारवाई: चोरीची मोपेड जप्त, आरोपी गजाआड