नाशिक | २६ जून २०२५
Kalidas Kalamandir News – शहरातील प्रतिष्ठित महाकवी कालिदास कलामंदिर, जो कधीकाळी नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानला जायचा, आज अस्वच्छता, दुर्लक्षित देखभाल आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा बळी ठरत आहे. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत १२.५ कोटी रुपये खर्चून कलामंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले असले तरी, त्याची सध्याची अवस्था मात्र याच ‘स्मार्टनेस’वर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सांस्कृतिक स्मारकाची आतून ढासळलेली प्रतिमा: (Kalidas Kalamandir News)
- लॉबीच्या छताची पाणीगळती, भिंतींवरून पोपड्यांचे गळणे
- ग्रीनरूममध्ये प्रकाशयंत्रणा गायब, इलेक्ट्रीकल पॉइंट खराब
- पुरुष स्वच्छतागृहातून प्रखर दुर्गंधी – प्रेक्षकांचा अनुभव खराब
- जिन्याखाली अडगळ, झाडांची मुळे भिंतींवर – ओलसरपणा आणि जळमटे
महाकवी कालिदास जयंतीच्या दिवशी विरोधाभास:
बाहेरून आकर्षक रोषणाई आणि आत मात्र अस्वच्छता आणि व्यवस्थेचा बकालपणा – हीच वास्तवदर्शी परिस्थिती आहे.
रंगकर्मींना होतोय त्रास; ‘नवीन रंगमंच’ केवळ नावालाच?
हौशी रंगकर्मींना नाटक तालमीनंतरही पहिल्या मजल्यावरील कुलूपबंद हॉल उपलब्ध होत नाही.
कलादालनाचीही अवस्था निराशाजनक आहे. रंगकर्मी व अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह अनेकांनी यासंदर्भात सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
“दोन-तीन दिवसांतून सफाई होते. परंतु नागरिक थुंकतात, त्याला आम्ही काय करणार?”
— स्थानिक सफाई कर्मचाऱ्याचे स्पष्टीकरण
सुधारणा करण्यासाठी रंगकर्मींनी मांडल्या मागण्या:
विद्युत, जलनिस्सारण, ग्रीनरूम इ. बाबींची तत्काळ देखभाल व्हावी
पहिल्या मजल्यावरील हॉल नाट्य तालमीसाठी खुले करावा व नाममात्र शुल्क आकारावे
‘म. फुले कलादालन’ाचे दोन विभाग करून त्यात ‘ब्लॅकबॉक्स थिएटर’ व छोटेखानी प्रदर्शनासाठी उपयोग करावा
स्वच्छतेसाठी वारंवार तपासणी आणि कर्मचारी नियुक्त करावेत