मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे जाहीर केले. बुलढाणा येथे आयोजित केलेल्या वचनपूर्ती सोहळ्यात विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत मिळणार असून, ती योजना राज्यभरात व्यापकपणे लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा निधी आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महिलांच्या आर्थिक प्रगतीवर भर देताना एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट सांगितले. या योजनेतून महिला लघु उद्योग सुरू करू शकतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.