Ladki Bahin’ Scheme Rumors : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत अफवांना पूर्णविराम – लाभार्थी महिलांकडून सक्तीने पैसे परत घेण्याचा सरकारचा इन्कार

Three percent error potential in application scrutiny of Ladaki Bahin Yojana; Position in Nashik Division

Ladki Bahan’ Scheme Rumors Stopped – Government Denies Forcing Beneficiary Women to Repay Money”

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक – निवडणुकीपूर्वी मोठ्या जल्लोषात जाहीर करण्यात आलेली आणि महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (LadkiBahin)योजना’ सध्या चर्चेत आली आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्रता निकष न पाळता लाभ घेणाऱ्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार असल्याच्या अफवा वेगाने पसरत होत्या. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, या चर्चांवर पडदा टाकत राज्य सरकारने यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे.

महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, “लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेचे पैसे सक्तीने परत घेण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. या संदर्भातील बातम्या आणि अफवा पूर्णतः निराधार आहेत.”

तथापि, काही अपात्र महिलांनी स्वतःहून पुढाकार घेऊन योजनेचा पुढील लाभ नाकारण्याची तयारी दाखवली असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर, सरकारने कोणत्याही प्रकारचा सक्तीचा दंड लावण्यास नकार दिला आहे.

सरकारचा दृष्टीकोन सकारात्मक
राज्य सरकारने या योजनेबाबत अधिकृतरीत्या जाहीर केले आहे की, कोणत्याही लाभार्थ्यांकडून सक्तीने पैसे परत घेतले जाणार नाहीत. योजनेची लोकप्रियता आणि महिलांना मिळालेली आर्थिक मदत लक्षात घेता, सरकारची भूमिका ही महिलांच्या पाठीशी उभी राहणारी आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
महिला व बालविकास विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा असल्याने, लाभार्थी महिलांशी सहकार्याने काम करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.