Lavani Performance Ban in Nashik? नाशिकमध्ये लावणी सादरीकरणावर बंदी? लोककलावंत आक्रमक!

Lavani Performance Ban in Nashik? Folk Artists Protest Aggressively!

लावणी कलाकारांचा प्रशासनाला इशारा – बंदी तात्काळ उठवा!

नाशिक : महाराष्ट्राच्या लोकपरंपरेवर घाला?

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे लावणी सादरीकरणावर(Lavani Performance) अचानक घालण्यात आलेली बंदी चुकीची आहे आणि ती त्वरित उठवावी, अशी मागणी लावणीसम्राज्ञी नंदा पुणेकर आणि अन्य लोककलावंतांनी केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

महापालिका आयुक्तांना निवेदन

लावणी कलाकारांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन बंदी हटवण्याची मागणी केली. लावणी ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असून, राज्यातील अन्य नाट्यगृहांमध्ये तिला परवानगी आहे. मात्र, नाशिकमध्येच ही बंदी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लावणी कलाकारांना (Lavani Performance)फटका

कालिदास कलामंदिरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात, ज्यात नाटक, ऑर्केस्ट्रा, हिंदी-मराठी गाणी आणि वाद्यवृंद यांचा समावेश असतो. मात्र, एका व्यवस्थापकाच्या निर्णयामुळे लावणी कलाकारांना अन्याय सहन करावा लागत आहे.

Lavani Performance Ban in Nashik? Folk Artists Protest Aggressively!
Lavani Performance Ban in Nashik? Folk Artists Protest Aggressively!

Lavani Performance “लावणी महाराष्ट्राची खरी ओळख” – नंदा पुणेकर

नऊवारी साडी, चाळ आणि अंबाडा घालून नृत्य करणाऱ्या लावणी कलाकारांना महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेण्याचे काम करत असताना, अशा प्रकारची बंदी लावणे अन्यायकारक असल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे.

लोककलावंतांचा इशारा – निर्णय मागे घ्या!

बंदी हटवण्यासाठी तमाशातील वगनाट्य भूमिका करणारे ज्ञानेश्वर वाघमारे, त्र्यंबक सायाळे, सुनीता वाघमारे, सुनीता सायाळे आणि गोंधळी भूमिका करणारे अन्य कलाकारांनी आवाज उठवला आहे. प्रशासनाने त्वरित निर्णय बदलावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लोककलावंतांनी दिला आहे.

नाशिकमध्ये लावणीवर बंदी – योग्य की अयोग्य?

तुमच्या मते, नाशिकमध्ये लावणी सादरीकरणावर बंदी योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा!

He Pan Wacha : आयुक्त मनीषा खत्रींचा ठेकेदार लॉबीला दणका जिओ टॅगिंग प्रणाली रद्द