Leopard : जाखोरीत विहिरीत बिबट्याचा अडकला जीव; वन विभागाचा यशस्वी बचाव

Here is the visual representation of the dramatic leopard rescue scene you described. Let me know if you’d like any modifications or further details!

Leopard बिबट्याचा बचाव: जाखोरी नाशिकमध्ये वन्यजीव संरक्षणाचे उत्तम उदाहरण

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिकरोड ..जाखोरी येथील संतोष वामन जगळे यांच्या मालकीच्या विहीरीत आज पहाटेच्या सुमारास एका नर जातीच्या बिबट्याला Leopard पडलेले आढळले. या घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्रातील जलद वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला Bibtya सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

वनविभागाच्या माहितीनुसार, बिबट्या Leopard कुत्र्याच्या शिकार करण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडला. वय अंदाजे 6-7 वर्षे असलेला हा बिबट्या कठडे नसलेल्या विहीरीत पडून एका कपारीवर अडकलेला होता. वन्यजीव बचाव पथकाने पिंजऱ्याचा वापर करत अत्यंत काळजीपूर्वक अर्ध्या तासात बिबट्याला बाहेर काढले.

बिबट्याला Leopard सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यासाठी बिबट्याला वन्यप्राणी उपचार केंद्र, म्हसरूळ येथे हलवण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर तो योग्य स्थितीत असल्याचे समोर आले आहे.

या बचाव कार्यामध्ये उपवनसंरक्षक (पश्चिम भाग नाशिक) सिद्धेश सावर्डेकर, सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन पार पडले. बचाव कार्यामध्ये जलद वन्यजीव बचाव पथकाचे वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजय पाटील, दीपक जगताप यांच्यासह ग्रामस्थ आणि टीम रेस्क्यूच्या अभिजीत महाले, हर्षद नागरे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

जाखोरी येथील ही घटना वन्यजीव संरक्षणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे एक उल्लेखनीय उदाहरण ठरली आहे. बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ आणि वन्यजीव बचाव पथकाने दाखवलेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे एक जीव वाचवता आला आहे.

Nashik Road भागात सुनील सूर्यवंशीचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांनी सुरू केली तपास”He Pan Wacha :