लढाणा: शहरातील चिखली रोडवरील वृंदावन नगरमध्ये अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरवस्थेचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. याच संतापातून, एका नागरिकाने आपली दुचाकी पेटवून रस्त्यावरील असुविधांचा निषेध व्यक्त केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राजू भीमराव भगत असे या दुचाकी चालकाचे नाव असून, ते रात्री खराब रस्त्यावरून जात असताना पडले. या दुर्घटनेने त्रस्त होऊन, त्यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता आपल्या दुचाकीला पेटवून रस्त्याच्या दुरवस्थेचा तीव्र निषेध नोंदवला.
वृंदावन नगरमधील रस्ता अनेक वर्षांपासून खराब स्थितीत असून, त्याचे बांधकाम वारंवार मागणी करूनही अद्याप झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राजू भगत यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी हा अनोखा मार्ग निवडला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.