राज्यातील विविध तीर्थस्थळे व पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 305 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

Maharashtra Receives ₹1,492 Crore Aid for Flood Relief; CM Shinde Thanks Modi and Shah

आज राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी 63 लाख रुपयांच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग सुविधा उभारण्यासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क, मंगळग्रह देवस्थान, कोयना जलाशय येथे जलक्रीडा पर्यटन सुविधा यांसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांनाही मान्यता मिळाली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

याशिवाय अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी तसेच शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी निधी वितरीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला. नागपूर शहरातील लक्ष्मीनारायण शिवमंदीर आणि इतर तीर्थस्थळांच्या विकास आराखड्यांनाही बैठकीत मंजुरी मिळाली.मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावीत यावर भर दिला, तसेच तातडीने नियोजन करण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply