Devendra Fadnavis : महाराष्ट्राची एआय क्रांती! मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Loudspeaker ban,

मुंबई: महाराष्ट्र लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट 2025 मध्ये ते बोलत होते. राज्यात डिजिटल सेवांचे प्रमाण वाढत असून बहुतांश सरकारी सेवा ऑनलाइन झाल्या आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य!

महाराष्ट्राने ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई महानगर क्षेत्र (MMRDA) १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवला जाणार आहे. यासाठी नीती आयोगाच्या सहकार्याने आर्थिक रोडमॅप तयार केला जात आहे.

Devendra Fadnavis डेटा सेंटर आणि फिनटेकमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

  • देशातील ६०% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत.
  • नवीन मुंबईत डेटा सेंटर पार्क उभारले जात आहे.
  • २०३० पर्यंत राज्यातील ५०% वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल.
  • मुंबई ही भारताची फिनटेक राजधानी म्हणून उदयास येत आहे.

२०२७ नाशिक कुंभमेळ्यात तंत्रज्ञानाचा जलवा!

  • गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि आभासी अनुभवासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
  • उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी महाकुंभमेळा आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.

शेतीमध्ये डिजिटल क्रांती!

  • ‘अ‍ॅग्री-स्टॅट’ उपक्रमामुळे संपूर्ण शेती प्रक्रिया डिजिटल होणार.
  • ‘ड्रोन शक्ती’ कार्यक्रमांतर्गत ड्रोन प्रशिक्षण, शेती फवारणीचा खर्च कमी करण्यासाठी मदत.
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

तिसरी मुंबई – भारताची पहिली ‘इनोव्हेशन सिटी’!

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ‘तिसरी मुंबई’ विकसित होणार.
  • ३०० एकरमध्ये तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर भर.
  • मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे GCC पार्क विकसित केले जाणार.

महाराष्ट्रातील स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना या क्रांतीत सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र लवकरच भारतातील सर्वात मोठे AI आणि टेक हब बनणार आहे!