नाशिकरोड –महावितरणचा स्मार्ट टीओडी मीटर महाराष्ट्रातील घरगुती वीजग्राहकांसाठी महावितरणने स्मार्ट टाइम ऑफ डे (टीओडी) मीटरद्वारे वीज बचतीचा नवा मार्ग खुला केला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) पुढील पाच वर्षांसाठी (२०२५-२०३०) सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान वापरलेल्या विजेवर प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे.
१ जुलै २०२५ पासून ही योजना लागू झाली असून महावितरणकडून हा मीटर ग्राहकांना मोफत बसविला जात आहे.
स्मार्ट टीओडी मीटरचे फायदे
- स्वयंचलित मासिक रीडिंग – कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगमधील चुका जवळपास संपुष्टात.
- मोबाइलवर विजेचा वापर – दर अर्ध्या तासाला विजेचा वापर थेट मोबाईल ॲपवर पाहता येणार.
- ऊर्जा नियोजन सुलभ – योग्य वेळेत उपकरणांचा वापर करून वीजबिलात लक्षणीय बचत.
- सौरऊर्जा प्रकल्पांसाठी उपयुक्त – वापरलेली आणि शिल्लक वीज याचा अचूक हिशेब ठेवता येईल.
सवलतीचा टप्प्याटप्प्याने लाभ
- जुलै २०२५ – मार्च २०२६: ८० पैसे प्रतियुनिट सवलत
- २०२७: ८५ पैसे
- २०२८-२०२९: ९० पैसे
- २०३०: १ रुपया प्रतियुनिट
प्रीपेड नव्हे, पोस्टपेड सुविधा (महावितरणचा स्मार्ट टीओडी मीटर)
हा मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड आहे – म्हणजे आधी वीज वापरा आणि नंतर मासिक बिल भरा. यामुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.