Nashik News | Industry Update 2025 -Mahindra’s EV Project Nashik – नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील आडवण आणि पारदेवी परिसरात उभारला जाणारा महिंद्रा अँड महिंद्रा ईव्ही प्रकल्प आता केवळ ३०० एकर जागेतच होणार आहे. प्रारंभी हा प्रकल्प ६०० एकरांवर प्रस्तावित होता, मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे जागा कमी करत अखेर ३०० एकरांवर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
महिंद्राची संमती पत्रासह
मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, महिंद्राने या बदलाला लेखी संमती दिली असून त्याबाबतचे पत्र त्यांनी बैठकीत सादर केले. प्रकल्प नाशिकमध्येच राहावा, यासाठी स्थानिक मंत्री आणि औद्योगिक संघटनांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
उद्योजकांसोबत बैठक (Mahindra’s EV Project Nashik)
नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा) आयोजित बैठकीत ही माहिती दिली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, सरोज आहिरे, हिरामण खोसकर, निमा अध्यक्ष आशिष नहार आदी उपस्थित होते.
प्रदर्शन केंद्र आणि ट्रक टर्मिनस
- अंबड औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनस व इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचे लवकरच उद्घाटन होणार.
- महापालिकेच्या तपोवनातील 94 एकर जागेत कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारले जाणार असून पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होणार.
- हे केंद्र ११ वर्षे उद्योजकांसाठी, तर १२ व्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उपलब्ध असेल.
ड्रायपोर्ट आणि डिफेन्स क्लस्टर
- जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्रायपोर्ट सुरू करण्याची योजना; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका सकारात्मक.
- नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टर उभारण्यासाठी ‘लॅण्ड बँक’ तयार करण्याची गरज, कारण सध्या योग्य जागेचा तुटवडा आहे.