Malegaon Sugar Factory Election | माळेगाव साखर कारखाना निवडणूक : अजित पवारांच्या पॅनलचा दणदणीत विजय, 21 पैकी 22 जागा पटकावल्या

Malegaon Sugar Factory Election | Malegaon Sugar Factory Election: Ajit Pawar's panel wins resounding victory, wins 20 out of 21 seats

शरद पवार यांच्या पॅनलचा पराभव, कष्टकरी पॅनलचेही खाते न उघडता अपयश

बारामती |

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Malegaon Sugar Factory Election माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘नीलकंठेश्वर’ पॅनलने मोठा विजय मिळवत २१ पैकी तब्बल २० जागा आपल्या नावे केल्या आहेत. तर शरद पवार यांच्या ‘बळीराजा’ पॅनलसह ‘कष्टकरी’ पॅनलचा पूर्ण पराभव झाला आहे.

‘सहकार बचाव’ पॅनलमधील चंद्रकांत तावरे हे एकमेव उमेदवार विजयी ठरले असून त्यांचा पॅनल अवघ्या एका जागेवरच समाधान मानावे लागले.

३५ तास मतमोजणीनंतर स्पष्ट निकाल (Malegaon Sugar Factory Election)

या निवडणुकीसाठी २२ जून २०२५ रोजी मतदान पार पडले. त्यानंतर तब्बल ३५ तास चाललेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाले. या निकालांमुळे बारामतीच्या सहकारी साखर क्षेत्रात अजित पवारांची पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

अजित पवार ठरणार चेअरमन

ही निवडणूक अजित पवारांनी स्वतःच्या प्रतिष्ठेशी जोडलेली असून त्यांनी स्वतः संचालकपदासाठी उमेदवारी केली होती. ते विजयी झाल्यामुळे ते आता चेअरमन पद भूषवतील हे जवळपास निश्चित आहे.

८५ वर्षीय चंद्रकांत तावरे यांचा प्रयत्न अपुरा

८५ वर्षीय चंद्रकांत तावरे यांनी ‘सहकार बचाव’ पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत प्रवेश करत मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र त्यांच्या पॅनलला केवळ एकाच जागेवर यश मिळाले, आणि बहुतेक उमेदवार पराभूत झाले.

राजकीय दृष्टिकोनातून निवडणूक महत्त्वाची

ही निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी ‘पक्षांतर्गत शक्तीप्रदर्शन’ म्हणून पाहिली जात होती. त्यामुळे या निकालाचे राजकीय आणि सहकारी क्षेत्रात दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.