Manikrao kokate : ‘फाडफाड’ बोलण्याने चर्चेत आलेले कृषीमंत्री’

Manikrao kokate

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate)यांच्या परखड आणि बेधडक स्वभावामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. पीक विमा आणि छगन भुजबळ यांच्यावर टीकेने आणलेल्या वादांची सविस्तर माहिती.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राज्याचे नवे कृषीमंत्री आणि नाशिकचे भूमिपुत्र अॅड. माणिकराव कोकाटे Manikrao kokate यांच्या “फाडफाड” स्वभावाने राजकीय वर्तुळात नवा रंग भरला आहे. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच टप्प्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका करून चर्चेला तोंड फोडले. यानंतर पीक विम्याच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याने अधिक वाद निर्माण केला. “तीन-चार टक्के भ्रष्टाचार झाला म्हणून योजना बंद करायची काय?” असा परखड प्रश्न विचारून त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेवरही बोट ठेवले.

मात्र, त्यांच्या या थेट आणि बेधडक बोलण्यामुळेच माध्यमांनी त्यांना चांगलेच झोडपले. कोकाटे यांनी या सगळ्याला “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला” असे म्हणत माध्यमांवर खापर फोडले. राजकीय नवख्या मंत्र्यांच्या या बाण्याला जनतेचा पाठिंबा मिळेल की टीका होईल, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

कोकाटेंच्या “फाडफाड” स्वभावामुळे मंत्रिपदाच्या सुरुवातीला अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पण त्यांचं हे बोलणं शेवटी त्यांना नडतंय का फायद्याचं ठरतंय, हे येणारा काळच ठरवेल.