Manisha Khatri : नाशिक महापालिका आयुक्तपदी मनिषा खत्री; कर्डिले यांची सिडकोत बदली

Manisha khatri NMC aayukt

नाशिक/ नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनिषा खत्री Manisha Khatri यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची या पदावर पूर्वी नियुक्ती झाली होती, परंतु ती नियुक्ती रद्द करून त्यांना नवी मुंबई येथील सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मनिषा खत्री Manisha Khatri या नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या नियुक्तीने नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थापनात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.

महापालिका आयुक्त पदाच्या बदल्यांवर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेच्या आयुक्तपदाला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षांमध्ये आपापला प्रभाव टिकवण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे.

कर्डिले यांची उचलबांगडी

डॉ. अशोक करंजकर यांची उचलबांगडी करत राहुल कर्डिले यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, एका मंत्र्याने या निर्णयावर आक्षेप घेतल्यानंतर 24 तासांच्या आतच कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यांच्या ऐवजी मनिषा खत्री यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मनिषा खत्री Manisha khatri यांची प्रशासनातील ओळख: खत्री यांचा कार्यकाळ अत्यंत नियोजनबद्ध असून, त्यांनी आधीच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

मनिषा खत्री यांना सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या कामकाजाला गती देणे, तसेच प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी मिळाली आहे. दुसरीकडे, कर्डिले यांना सिडकोमधील सहव्यवस्थापकीय संचालकपदावर मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे पण वाचा : Nashik Mahapalika : महापालिकेत भूसंपादनाचे अनियमित व्यवहार: आगामी हिवाळी अधिवेशनात होणार चर्चा