“Former Prime Minister Dr. Manmohan Singh, a stalwart in India’s political and economic landscape, passes away. A tribute to his remarkable legacy and contributions to the nation.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नवी दिल्ली, : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग Manmohan Singh यांचे आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल सायंकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. देशाच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग Dr. Manhona sing यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. मनमोहन सिंग Manmohan Singh यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमध्ये झाला. सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. सिंग यांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. अर्थशास्त्रातील ज्ञानामुळे ते देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून उदयास आले. १९९१ साली ते भारताचे अर्थमंत्री झाले आणि भारताला आर्थिक सुधारणांच्या दिशेने नेण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
त्यांनी २००४ ते २०१४ या काळात भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक आणि सामाजिक धोरणे राबवली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्दे तर्कशुद्ध आणि व्यावहारिक असल्यामुळे त्यांना विरोधकांमध्येही मान्यता होती.
डॉ. मनमोहन सिंग Manmohan Singh यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. आपल्या श्रद्धांजली संदेशात त्यांनी डॉ. सिंग यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. मोदींनी म्हटले, “डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे संपूर्ण देशासाठी दुःखदायक आहे. सामान्य पार्श्वभूमीतून आलेले डॉ. सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ आणि सक्षम प्रशासक होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.”
मोदींनी आणखी लिहिले, “ते देशाचे पंतप्रधान असताना मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आमच्यात नेहमी सुसंवाद होता. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही विस्तृत चर्चा करत असू. त्यांची विनम्रता आणि बुद्धिमत्ता नेहमीच प्रेरणादायक होती. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.”
पंतप्रधान मोदींसह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर अनेक नेत्यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींनी आपल्या संदेशात म्हटले, “डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन प्रेरणादायी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगतीचा नवा मार्ग शोधला.”
डॉ. मनमोहन सिंग Manmohan Singh यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली. जागतिकीकरणाच्या दिशेने भारताला नेण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्थांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ शांततामय आणि स्थिर राहिला.
डॉ. मनमोहन सिंग Manmohan Singh यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकमग्न आहे. सोशल मीडियावरून नागरिकांनीही त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक प्रामाणिक, शांत आणि तत्त्वनिष्ठ नेते हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
He Pan Wacha : Sushma Swaraj: डॉ. मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांचा संसदेतील अविस्मरणीय शेरो-शायरीचा किस्सा!