Manoj Jarange Patil : “मनोज जरांगे पाटील यांचा इशारा: देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून हटवल्याशिवाय शांत बसणार नाही!”

manoj-jarange-warns-devendra-fadnavis-to-be-removed-from-power

Latest News : मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका करत, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांना जबाबदार ठरवलं आहे. जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत म्हटलं की, “देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचं वाटोळं करायचं होतं. मराठ्यांना आम्ही मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. त्यांची सत्तेवर असताना निर्णय घेण्याची क्षमता होती, पण त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. आता मात्र मराठा समाजच त्यांना मत देणार की नाही, हे ठरवेल.”

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळावं की नाही, हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता, पण त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र रचलं आणि त्यांची आयुष्ये उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना त्यांनी डावललं.”

फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत, मराठा समाजाच्या विरोधात चाल रचली. “त्यांनी जाणीवपूर्वक १७ जातींचा समावेश ओबीसीमध्ये केला, पण मराठ्यांना आरक्षण नाकारलं. त्यावेळीच आम्हाला समजलं होतं की फडणवीस आपल्याला आरक्षण देणार नाहीत,” असं जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला की, आता मराठा समाज शांत बसणार नाही. “देवेंद्र फडणवीस यांना आम्ही यावेळी मतपेटीतून धडा शिकवणार आहोत. सत्तेत असूनही त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही, आणि आता आम्ही त्यांना सत्तेतून हटवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

.