नवीन नासिक सिडको येथील स्वामी विवेकानंद नगर राणेनगर मध्ये सेक्टर एन 34 व 35 इमारती मध्ये मनपाचे पाणी गेल्या आठ ते दहा दिवसापासून गढुळ येत असून येथील काही घरातील मनपा च्या नळातून पिण्याच्या पाण्यातून आळई व किडे आले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या दूषित पाण्यामुळे घरातील लहान मुलं व वृद्ध व्यक्तींचे आरोग्य धोक्यात आले असून आजारी पडण्याचे प्रमाण वाढ झाली आहे. स्वामी विवेकानंद नगर येथे एन 34 व 35 इमारत सिस्टीम असून तिसऱ्या मजल्यावर पाणी अगदी कमी दाबाने रोज येत असल्याचे नागरिकांची तक्रार आहे.
नासिक मध्ये पावसाचे प्रमाण वाढझाली असून धरणे ही चांगल्या प्रकारे भरली आहे मग पाणी कमी दाबाने का? सोडले जाते असा सवाल मनपा अधिकाऱ्यांना येथील नागरिक करत आहे.
लवकरात लवकर येथील दूषित पाणी व कमी दाबाच्या पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती नवीन नासिक मनपा संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी केली
आहे. अन्यथा महिला वर्गाकडून आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.