कोल्हापूर | 24 फेब्रुवारी 2025 – मराठा समाजाच्या (Maratha Community’s) विविध मागण्यांसाठी राज्यातील 42 मराठा संघटनांनी आज कोल्हापूर येथे एकत्रित परिषद घेतली. या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 मार्चपर्यंत बैठक घ्यावी आणि ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मराठा समाजाच्या Maratha community s)प्रमुख मागण्या:
मराठा संघटनांनी 11 ठराव पारित करत शासनाकडे मागणी केली आहे की –
- ओबीसीसाठी लागू सवलती मराठा समाजालाही मिळाव्यात.
- हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटच्या आधारावर अंमलबजावणी करावी.
- एसईबीसी (मराठा) विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शुल्क सवलत द्यावी.
- कुणबी प्रमाणपत्रांसाठी जिल्हा व तालुका समिती गठीत करावी, त्यात मराठा समाजाच्या दोन प्रतिनिधींना संधी द्यावी.
- परराज्यात शिकणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शिष्यवृत्ती योजना लागू करावी.
- मराठा युवक-युवतींसाठी वाहनचालक व वाहक प्रशिक्षण योजना सुरू करावी.
- मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.
- मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी सरकारने प्रभावी युक्तिवाद करावा.
- ‘आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’ केवळ मराठा समाजासाठी लागू करावे आणि कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावीत.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे काम त्वरित सुरू करावे.
- महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे.
संघटनांचा सरकारला इशारा
मराठा संघटनांच्या म्हणण्यानुसार, आजवर केवळ आश्वासनांच्या गोळ्या देत समाजाला झुलवत ठेवण्यात आले आहे. यापुढे संयम ठेवला जाणार नाही, सरकारने 10 मार्चपर्यंत बैठक घेतली नाही तर आंदोलन अटळ आहे. सुरुवातीला संवाद साधला जाईल, मात्र जर प्रतिसाद मिळाला नाही तर विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे.
सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.