MHADA Nashik Housing Lottery : म्हाडाच्या नाशिक मंडळात ४९३ घरांसाठी सोडत; ७ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

Affordable Housing Scheme Nashik MHADA 20 Percent Inclusive Housing Nashik Housing Lottery Registration

MHADA Nashik Housing Lottery

नाशिक – सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळावे, यासाठी म्हाडाच्या (Mhada) नाशिक मंडळाने ४९३ घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही घरे २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध होणार असून, दोन ते तीन दिवसांत त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारीपासून नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेस सुरुवात होईल.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Mhada कशी आहे ही योजना?

राज्य सरकारच्या २० टक्के सर्वसमावेशक योजनेनुसार, १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये २०% घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिकमधील अनेक विकासकांनी ही घरे म्हाडाला देण्यास टाळाटाळ केली. तरीही म्हाडाने (Mhada)सातत्याने पाठपुरावा करत ४९३ घरे मिळवली असून, ती आता पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Mhada कुठे असतील ही घरे?

ही घरे अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी असणार असून, त्यांचे क्षेत्रफळ २९.९७ चौ. मीटर ते ४९.९६ चौ. मीटर इतके आहे. नाशिकमधील विविध प्रकल्पांमध्ये ही घरे उपलब्ध आहेत, जसे की:
अवध युटोपिया, मखमलाबाद
सातपूर साई पार्क
यशोदा अपार्टमेंट, पाथर्डी शिवार
अर्पण हाऊसिंग, व्हिटागाव शिवार
जगन्नाथ हाइटस, म्हासरूळ शिवार
रामबाग, नाशिक शिवार
गणेश आरंभ, पिंपळगाव
तुळसीबाग, देवळाली

किंमती किती असतील?

या घरांच्या किंमती १२ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत असतील. त्यामुळे किफायतशीर दरात आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज घरे मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे.

काय करावे?

इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून ७ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होताच नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून करण्यात आले आहे. मार्चमध्ये सोडत जाहीर होईल.

घर घेण्याचे स्वप्न आता होणार साकार!

परवडणाऱ्या घरांसाठी वाट पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. म्हाडाची सोडत पारदर्शक आणि विश्वासार्ह असल्याने इच्छुकांनी वेळ न दवडता तयारीला लागावे.

संपर्कासाठी:

म्हाडा नाशिक मंडळ कार्यालय
(अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाईन क्रमांक लवकरच प्रसिद्ध होईल.)