दिग्रसजवळील कोपरा येथे मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. त्यांच्या वाहनाने पुढे असलेल्या पीकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पीकअप वाहन पलटी झाले असून त्याचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सुदैवाने, मंत्री राठोड आणि त्यांच्या वाहनाचा चालक या अपघातातून सुरक्षित बचावले आहेत.अपघात इतका जोरदार होता की राठोड यांच्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
मात्र, वाहनातील एअर बॅग वेळेवर उघडल्याने मोठा अनर्थ टळला आणि मंत्री राठोड यांना कोणतीही शारीरिक दुखापत झाली नाही. त्यांचा चालक देखील सुरक्षित आहे.अपघातानंतर घटनास्थळी मदत कार्य सुरू करण्यात आले असून, जखमी पीकअप चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास केला जात आहे.पालकमंत्री राठोड यांचे सुदैवाने बचाव झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.