चांदवड: आगामी विधानसभा निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या तिकिटासाठी सुरू असलेल्या आहेर बंधूंच्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे त्यांच्या मोठे बंधू आणि नाफेड संचालक केदानाना आहेर यांना तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आ. राहुल आहेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुटुंबात कोणताही वाद निर्माण होऊ नये आणि कुटुंब एकसंघ राहावे यासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्या या मागणीला पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून चांदवड-देवळा मतदारसंघात आहेर बंधूंच्या तिकिटाच्या मागणीवरून संघर्ष सुरू होता. मात्र, आता आ. राहुल आहेर यांच्या निर्णयामुळे मोठे बंधू केदा आहेर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून, त्यांना भाजपचे तिकीट मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.