मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला इशारा: “दूषित पाणी तुम्हालाच पाजू!”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
MNS – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील नद्यांच्या प्रदूषणावर भाष्य केल्यानंतर नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी गोदावरी नदी प्रदूषणविरोधात हटके आंदोलन छेडले. रामकुंड परिसरात गोदावरी नदीत डुबकी मारत त्यांनी मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी केली.
MNS गोदावरीसाठी डुबकी आंदोलन: स्वच्छतेचा नवा संघर्ष
दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. 9 एप्रिल) गोदावरी स्वच्छतेसाठी आंदोलन केले. डुबकी मारत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“गोदावरीचे पावित्र्य अबाधित राहिले नाही तर, शहरातील प्रत्येक नदीतील दूषित पाणी प्रशासनाला प्यायला दिले जाईल,” असा थेट इशाराच मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.
MNS भ्रष्टाचाराचा आरोप आणि कुंभमेळ्याची तयारी
गोदावरीसाठी प्रचंड खर्च करूनही नदी स्वच्छ न होणे, हे प्रशासनातील भ्रष्टाचाराचे द्योतक आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
MNS कुंभपूर्वी प्रदूषणमुक्त गोदावरीची गरज
2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी आणि तिच्या उपनद्या प्रदूषणमुक्त करणे अत्यावश्यक असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले. त्यांनी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यावर भर द्यावा, अशी मागणी केली.
MNS आंदोलनात कोण होते सहभागी?
या आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, संदीप किरवे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे, सचिन सिन्हा, तसेच अनेक साधू-महंत सहभागी झाले होते.